सहजयोग ध्यान- आयुष्य घडविण्यासाठी माय लाईफ , माय मेडिटेशन, मेडिटेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन
आपल्यासमोरील समस्या-
आजच्या स्पर्धेच्या मॉडर्न युगात अनेक मॉडर्न समस्या दैनंदिन जीवनात आहेत. आरोग्याच्या समस्या , शरीराची दुखणं , अपेक्षित यश न मिळण्याची भीती, त्यातून निर्माण होणारे नैराश्य, ताण-तणाव, अपेक्षांचे ओझे, नकारात्मक विचार, चिड-चिड होणे , राग येणे , नातेसंबंधात तणाव , अतिविचार , कामात लक्ष न लागणे अश्या अनेक मॉडर्न समस्या दैनंदिन जीवनात आहेत. तुम्हाला देखील या समस्या जाणवत आहेत का? या समस्यांचा सामना करायला आपल्या शरीरातील सुप्त शक्ती च्या जागृतीद्वारे (स्व - च्या तंत्राद्वारे ) ध्यानाने स्वपरिवर्तनाची सुरवात करूया.
आपण काय करू शकतो?
तुम्हाला देखील या समस्या जाणवत आहेत का? मग या समस्यांचा सामना करायला आपल्या शरीरातील सुप्त शक्ती च्या जागृतीद्वारे ध्यानाने स्वपरिवर्तनाची सुरवात करूया. सर्व वयोगटातील महिला व पुरुषांनी व्यक्तिगत विकास व क्षमता वाढविण्यासाठी ध्यान शिकणे आवश्यक आहे.
प्रत्येकात सुप्त शक्ती ही जन्मापासून निद्रिस्त अवस्थेत असते. ह्या शक्तीच्या जागृतीद्वारे आणि दैनंदिन ध्यानाद्वारे आपली कार्यक्षमता वाढते आणि समस्यांचा सामना करणे सोपे होते. ध्यानाद्वारे हे शक्य आहे.
विनामूल्य ध्यान उपक्रम-
श्री माताजी निर्मालादेवी यांनी सुरू केलेल्या दैनंदिन सहजयोग ध्यानाद्वारे गेल्या पन्नास वर्षांत असंख्य सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून संतुलित आणि यशस्वी आयुष्य अनुभवत आहे. गरज आहे फक्त आपल्या इच्छा शक्तीची. शास्त्रीय पद्धतीने घरी ध्यान कसे करायचे हे आपण या एप मार्फत शिका.
सहजयोग ध्यानाचे फायदे-
१. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास
२. सकारात्मक विचारशैली
३. ताणतणाव कमी होतो
४. आत्मविश्वास वाढतो
५. रोग प्रतिकार शक्ती वाढते
६. IQ, EQ, SQ वाढतो
७. चित्ताची एकाग्रता वाढते
८. चिडचिड कमी होते
९. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होते
१०. नैराश्य ( डिप्रेशन ) दूर होते
दैनंदिन लाईव्ह ध्यान प्रशिक्षण कार्यक्रम दररोज सायं 5 वा-
YouTube चॅनेल
www.youtube.com/c/learningsahajayoga
श्री माताजी निर्मालादेवी प्रणित
सहजयोग ध्यान केंद्र,
प्रतिष्ठान, पुणे, महाराष्ट्र
टोल फ्री 1800 30 700 800